“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं होतं.

तुम्हाला विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. नको त्या उद्योगात पडू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना उत्तर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील या धमकीवजा भाषेवरच राज्यपाल कोश्यारी यांनी बोट ठेवून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना लिहित प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रातील तुमचे धमकीवजा शब्द पाहून मी दु:खी आणि निराश झालोय, असं सांगतानाच मी संविधानाचा रक्षक आहे. मला सर्व संविधानिकबाबी तपासून निर्णय घ्यावा लागतो, असं राज्यपाल म्हणालेत.

भाषेचा टोन योग्य नाही. ती पाहून मी पाहून व्यथित झालो आहे. मी दुखी आहे, असं सांगतााच डेडलाईन दिली गेली त्यावरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी 10 ते 11 महिन्याचा वेळ घालवला. महाराष्ट्र विधानसभा नियम सहा आणि सातमध्ये सुधारणा करण्यात आली. अशाप्रकारे या दुर्गम सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासलं जाणं आवश्यक आहे. मी सभागृहाचा कार्यपद्धती आणि कार्यवाहिच्या बाबतीत त्याच्या विशेष अधिकारावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाही. पण प्रथम दर्शनीय दिसणाऱ्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलं.

घटनेच्या अनुच्छेद 208मध्ये नमूद केल्यानुसार असंवैधानिक आणि बेकायदेशीर असणे राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि बदनामी करण्याच्या तुमच्या पत्रांचा संयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी व्यक्तीरित्या दुखी आणि निराश झालो आहे, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

5 वाजता कळवलं गेलं आणि 6 वाजता उत्तर द्या असं सांगितलं गेलं. कोणताही निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारे माझ्यावर दबाव आणणं योग्य नाही. मी संविधानाचा रक्षक आहे, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

मला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करून मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी माझ्यावर तुम्ही कोणताही दबाव आणू शकत नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…” 

“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील” 

काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य 

कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर 

टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट