चंदीगड | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
भगवंत मान सरकारने पंजाबमध्ये आता राशनची डोअर स्टेप डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मान सरकार राज्यातील जनतेला घरपोच राशन देणार आहे.
पंजाब आम आदमी पार्टीने ट्विटरवरून मुख्यमंत्री भगवंत मान मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हा निर्णय जाहीर केला आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही गरीबांना राशन घेण्यासाठी रेशन दुकानाच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे, असं ते म्हणाले.
जग प्रचंड डिजीटल झालं आहे. एका फोन कॉलवर कोणतीही गोष्ट घरपोच मिळते. मग राशन का मिळू नये?, असा सवाल भगवंत मान यांनी केला आहे.
तुम्ही निवडलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने गोरगरीबांना घरापर्यंत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही डोअर स्टेप डिलिव्हरी म्हणजे घरापर्यंत राशन देणार आहोत. पीठ आणि डाळीही तुम्हाला घरापर्यंत देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन दोन किलोमीटरची पायपीट करून राशन आणायला जाणाऱ्या बुजुर्ग आईवडिलांनाही मी ओळखतो. अनेकदा राशन अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. त्याला वारंवार साफ करावं लागतं. तरीही त्यांना ते खावं लागतं. मात्र आता असं होणार नाही, असंही मान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव
घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली, पाहा व्हिडीओ
“25 वर्ष मुंबईला लुटणाऱ्या ठाकरे कुटुंबाला जेल झालीच पाहिजे”