“एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या जागी स्वत:चा फोटो लावतील”

मुंबई | मुंबईच्या गवालिया टॅंक परिसरातील तेजपाल हॉलमध्ये मंगळवारी काँग्रेसचा 137 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भाई जगताप बोलत होते. यावेळी भाई जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची ही परंपरा भविष्यात अशीच टिकून राहणार आहे आणि राहायलाच हवी. कारण आज ज्या भयावह परिस्थितीतुन देश जात आहे. त्यातून देशाला वाचवण्यासाठी देशाला काँग्रेसची आवश्यकता आहे, असं भाई जगताप म्हणाले.

केंद्रातील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला फकीर म्हणवतात. फकीर आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहेत. पण असा फकीर आम्ही कधीही पाहिलेला नाही, जो दिवसाला चार वेळेला आपला पोशाख बदलतो, ज्याने  627 करोडचे विमान 1620 करोड रुपयांना विकले असा फकीर आपण कधीही पाहिलेला नाही, अशी टीका भाई जगताप यांनी मोदींवर केली आहे.

भाई जगताप यांच्यासह मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी देखील भाजप तसेच नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.  आज आपले सौभाग्य आहे की, आपण अशा सभागृहामध्ये बसलेलो आहोत, जिथे 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या देशाला घडविण्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे, जे आपण कधीही विसरू शकत नाही, असं सप्रा म्हणाले.

आज देशामध्ये अशी बिकट परिस्थिती आलेली आहे, जिथे देशातील केंद्र सरकार समाजकारण न करता ध्रुवीकरणाला महत्व देत आहे. मला वाटतं की, आपले पूर्वज मग ते सरदार वल्लभभाई पटेल असोत, महात्मा गांधी असोत, पंडित जवाहरलाल नेहरू असोत किंवा दादाभाई नौरोजी असोत, त्यांनी कधी असा विचार केला नसेल की, एके दिवशी या देशात असे सरकार येईल ज्याच्या कार्यकाळात समाजकारण दुर्लक्षित करून ध्रुवीकरणाला महत्व दिले जाईल, असं सांगत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कधी महात्मा गांधी यांनी असा विचार केला नसेल की, या देशात अशी सुद्धा वेळ येईल जेव्हा एक पंतप्रधान खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधींचा फोटो काढून स्वतःचा फोटो लावतील. या देशामध्ये आता आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्यांचे सरकार बनलेलं आहे, अशी टीका त्यांनी मोदींवर केलीये.

आज काँग्रेसचा स्थापना दिवस आहे, एक ऐतिहासिक दिवस आहे आणि आज आपण संकल्प करायचा आहे की, आपल्याला या जातीयवादी ढोंगी लोकांच्या विरुद्ध लढायचं आहे. यांच्या जातीयवादी विचारांशी आपल्याला लढा द्यायचा असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला झटका, केलं ‘हे’ मोठं वक्तव्य 

कोरोनाची तिसरी लाट आली?; धडकी भरवणारी आकडेवारी समोर 

टाटाच्या ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; पैसे झाले दुप्पट 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ