सलमान खानला भेटली 21 वर्षाची नवी प्रेयसी!!!

मुंबई : मराठीतील अभिनेते महेश मांजरेकर यांची धाकटी मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. पदार्पणापूर्वीच सईची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ‘आयफा’ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ती नुकतीच सलमानसोबत झळकली होती.

बॉलिवूडमध्ये सईच्या ग्रँड एण्ट्रीसाठी ‘दबंग’ खानसुद्धा चांगलेच प्रयत्न करताना दिसतोय. ‘दबंग 3’मध्ये सई सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर सईसोबतचा एक फोटो पोस्ट केला असून सध्या या फोटोची चर्चा सुरू आहे.

फोटोमध्ये एका तलावाकाठी सलमानसोबत सई पाहायला मिळतेय. ज्या ठिकाणी ‘दबंग 3’चे चित्रीकरण सुरु आहे तिथला हा फोटो आहे. सईनेसुद्धा सलमानचा हा फोटो तिच्या अकाऊंटवर रिपोस्ट केला आहे.

‘भाईजान’ सलमान आजवर अनेक अभिनेत्रींसाठी बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ ठरला आहे. कतरिना कैफ, झरीन खान, डेझी शाह या अभिनेत्रींना त्याने बॉलिवूडमध्ये आणलं आहे. सईच्या निमित्ताने आणखी एक स्टारकिड इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. अभिनयाच्या बाबतीत ती प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, सईच्या निमित्ताने आणखी एक स्टारकिड इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. अभिनयाच्या बाबतीत ती प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

On location #dabangg3 . . . @saieemmanjrekar

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

महत्वाच्या बातम्या-