‘मला पक्षात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय’; काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट

पंढरपूर | काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भरत भालके यांच्या भाजपात प्रवेश करण्यासंबंधी राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी याच संबंधी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मी कोणाच्याही मागे लागलो नाही. मला भाजपात येण्यासाठी सारखं बोलावणं येतंय, असा गौप्यस्फोट भारत भालके यांनी केला आहे. मात्र जनताच माझा निर्णय घेईन, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भालके यांनी पंढरपूरात आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हा महत्वाचा खुलासा केला.

शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांना मुख्यमंत्री स्वत: फोन करून भाजपमध्ये येण्यास आमंत्रण देत आहेत, असं म्हटलं होतं. पवारांच्या याच आरोपाला आता पुष्टी मिळाली आहे.

आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी भालकेंच्या घरी चहा-नाश्त्याचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, मी अजून कोणाकडेही मला पक्षात घ्या म्हणून गेलो नाही. उलट मलाच सारखे फोन येतायेत. परंतू माझा निर्णय जनता ठरवेल, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीत घुमणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आवाज!

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते; संजय राऊतांनी मारला शालजोडीतून टोला

-राज ठाकरेंचं ‘मिशन विधानसभा’; या मुद्द्यावर घेणार ममता बॅनर्जींची भेट!

-पुण्यातील गहुंजे बलात्कारप्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

-चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा!