“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो”

उस्मानाबाद | कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) राज्यभरात हातपाय पसरत आहे. जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढली आहे. त्यातच महाराष्ट्रत ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लॉकडाऊनचा इशारा दिलाय.

रुग्ण संख्या वाढतच राहिली तर पुढील काळात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलाा आहे. त्या तुळजापूरमध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या, दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

देशासह राज्यावर कोरोनाचे संकट आहे. पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता देशात आणि राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोख्याण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. त

सेच जर एखाद्या मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असतीलत, तर ते मंदिर चालू ठेवायचे की बंद याचा निर्णय मंदिर प्रशासन घेऊ शकते, असंही भारती पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.

ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. 24 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल.

इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल.

महत्वाच्या बातम्या- 

नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे 

विधानसभेत कोरोनाचा शिरकाव! अधिवेशनातील ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी

भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेश निवडणुकीआधी प्रियंका गांधींनी दिला ‘हा’ नारा

“सनी लिओनीचा ‘तो’ व्हिडीओ 3 दिवसात हटवा”, गृहमंत्र्यांचा अल्टीमेटम