देशातील मंदीला भाजपच जबाबदार- संजय राऊत

नाशिक : देशातील मंदीला भाजपच जबाबदार आहे. देशातील जनतेला खायला अन्न व रोजगार नसेल तर कलम 370 आणि राम मंदिरासारखे मुद्दे गौण ठरु शकतात. त्यामुळे डॉ. मनमोहनसिंग यांसारख्या अर्थतज्ञांचं मत गांभीर्यानं घेतलं पाहिजे, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांशी आगामी विधानसभा निवडणूकीवर चर्चा केली. त्यांनी इच्छुक उमेदवारांची मत जाणून घेतली.

पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केलं. याचवेळी शिवसेना विरोधकाची भूमिका सोडणार नसल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.

केंद्र आणि राज्यातील सरकारमध्ये महत्वाची खाती भाजपकडे आहेत. त्यामुळे देशात जे काही घडते त्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. शिवसेनेकडे अत्यंत दुय्यम खाती आहेत. त्यामुळे आमच्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. अशावेळी जे अयोग्य वाटेल त्यावर शिवसेना जनहितासाठी विरोध करते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-