प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंहने सोडली मुंबई; समोर आलं ‘हे’ कारण

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी सर्वत्र सध्या निर्बंध लावायला सरकारनं सुरूवात केली आहे.

कोरोना महामारीच्या परिणामी सध्या विविध क्षेत्राला मोठ्या अडचणीत जावं लागत आहे. अनेक अडचणीत सापडत असताना आता या क्षेत्रातील व्यक्ती कोरोनापासून बचावासाठी शहरांपासून लांब जात आहेत.

प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंह मुंबईत वास्तव्यास असते. मुंबईत वास्तव्यास असल्यानं सिनेमा सृष्टीतील काम करताना अडचणी येत नाहीत.

मुंबई शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशामध्ये भारती सिंहनं आपल्या पतीसह मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई सोडून भारती सिंह सध्या आपल्या फार्म हाऊसवर राहायला गेली आहे. फार्म हाऊसवरूनच तिचं काही महत्त्वाची शुटींग ती पुर्ण करणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

भारती सिंह सध्या गरोदर असल्यानं तिनं हा निर्णय काळजीपोटी घेतल्याचं बोललं जात आहे. तरीही मुंबई सोडण्याचा तिच्या या निर्णयावर नेटकऱ्यांकडून टीका होत आहे.

भारती सिंह आपला पती हर्ष लिंबाचिया याच्यासोबत वेळ घालवत आहे. तिच्या गरोदरपणामुळं हर्ष सध्या तिची काळजी घेण्यात गुंतला आहे.

गरोदरपणाचा काळ हा कठीण आहे पण मी अगदी बाळांतपणापर्यंत काम करण्यावर भर देणार असल्याचं भारती सिंह म्हणाली आहे.

भारती सिंह सध्या ब्लाॅग लिहिण्यात आणि काॅमेडी व्हिडीओ बनवण्यात वेळ घालवत आहे. कोरोना संपल्यानंतर आपण परत मुंबईत येणार असल्याचं भारती म्हणाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या भितीनं भारती सिंह फार्म हाऊसवर गेल्याची माहिती भारतीनं आपल्या ब्लाॅगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 ‘माझं 67 लाख घेतलं…’, पोलीस चौकी गाठत नेता ढसाढसा रडला; पाहा व्हिडीओ

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख