विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले…

मुंबई | आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्यानं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले. तसेच भाजपच्या सदस्यांनी विधानसभा डोक्यावर घेतली.

आक्रमक झालेल्या विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत भास्कर जाधवांनी माफी मागण्याची मागणी केली. तसेच भास्कर जाधव यांना निलंबित करण्याचीही मागणी केली. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगितही करण्यात आलं.

विरोधकांच्या राड्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. मी बोलत असताना कळत नकळत हातवारे होतात. मी बोलण्याच्या ओघात पंतप्रधानांच्या विषयी काही अंगविक्षेप केले असतील किंवा नक्कल केली असेल असं फडणनीसांचं म्हणणं आहे. त्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला नाहीये की, भास्कर जाधवांनी कुठलाही आक्षेपार्ह शब्द वापरला. मी असंवेदनशील शब्द वापरला नाही, असं भास्कर जाधव म्हणाले.

मी अंगविक्षेप मागे घेतो म्हटलं पण देवेंद्र फडणवीसांना मान्य नाही. या सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं यासाठी मी याठिकाणी पंतप्रधानांच्या बाबतीत काही बोलल्याने सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंवेदनशील शब्द वापरला नाही जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तो मी उल्लेख केला तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो, असं भास्कर जाधवांनी म्हटलंय.

नेमकं सभागृहात काय झालं?

देशाच्या पंतप्रधान यांनी म्हटलं होतं की 15 लाख रुपये रुपये खात्यावर देणार म्हटलं होतं. त्यांनी दिलं का? असं नितीन राऊत म्हणाले. यावर पंतप्रधान यांनी असं वाक्य कुठ म्हटलं आहे हे दाखवा नाही तर माफी मागावी, असं फडणवीस म्हणाले.

या सभागृहाच्या बाहेरील व्यक्ती संदर्भात असं बोलता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे किवा शब्द मागे घेतला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. अशात यावर बोलताना भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केली. यावर विरोधक भडकले.

भास्कर जाधवांना निलंबित करा, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर भास्कर जाधव म्हणाले की, मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही.

अंगविक्षेप मागे घेता येतो का? हे आम्ही सहन नाही करणार. माफी मागीतली पाहिजे. पंतप्रधान यांचा असा अवमान होणार असेल तर हक्कभंग आणला जाईल, त्यांनी माफी मागावी, असं फडणवीसांनी म्हटलंय. पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही” 

भास्कर जाधवांनी मोदींची नक्कल केल्याने विधानसभेत राडा; देवेंद्र फडणवीस संतापले 

पेपरफुटीच्या चौकशीसाठी वेळ मागणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना नाना पटोलेंचं उत्तर, म्हणाले… 

“उद्धव ठाकरेंनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा” 

पेपर फुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; राजकीय कनेक्शनमुळं खळबळ