मुंबई | पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अचानक केलेल्या घोषणेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी देशाला संबोधित करताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक दिवस सर्वसामान्यांना पैशांसाठी बँकांबाहेर रांगा लावाव्या लागल्या होत्या. आता यावरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधला आहे.
गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काही केले आहे का? असं मोदींनी 2014 साली विचारलं होतं. तेव्हा लोकही म्हणाले होते काहीच केले नाही, आणि जनतेने मोदींना पंतप्रधान केले. मात्र देशाची सत्ता हाती येताच मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशातील एक-एक गोष्ट हळूहळू विकायला सुरुवात केली आहे, असं म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी देश विकायला कढला. आता लोकही त्यांना म्हणतात राजा विकणं बंद कर. भाजपापेक्षा काँग्रेस बरं होतं अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचं भास्कर जाधव म्हणालेत.
महागाईच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपवर टीका केली. 2014 साली महागाईवर भाजपाने रान उठवलं होतं. ते आपले मुद्दे आक्रमकपणे मांडत होते. याच मुद्द्यावरून त्यांची सत्ता आली, मात्र आता सध्याची परिस्थिती काय आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. नोटबंदीमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. सर्व कामधंदे सोडून बँकेत रागा लावाव्या लागल्या, या निर्णयाचा रोजगारावर देखील परिणाम झाला. मात्र प्रत्यक्षात हाती काहीच लागलं नसल्याचंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे कबरडं मोडलं आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढलं आहेत. लोकांना गॅस घेणं परवडत नाही. मोदींनी उज्वला योजना आणली लोकांना वाटलं फूकट मिळालं आहे, त्यामुळे अनेकांनी गॅस कनेक्शन घेतलं. मात्र आता सरकारने सबसीडी बंद केल्याने पुन्हा एकदा लोकांवर चूली पेटवण्याची वेळ आल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी असे म्हटलं आहे. काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवाद वाढला आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार गेल्या पाच वर्षामध्ये वाढला आहे. त्यामुळे नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे, अशी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली आहे.
आर्थिकदृष्ट्या संकट आल्याने शेकडो लोकांना प्राण आणि नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोटबंदीच्या निर्यणाबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, असंही संजय राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुम्ही ट्विटरवर उत्तर देता ना, तर मग इकडेही द्या’, उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना फटकारलं
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”
“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार
शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप