“हवेत उडणाऱ्या भाजपच्या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होईल”

मुंबई | भाजपच्या हवेत उडणाऱ्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, असं म्हणत शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते मुंबई माध्यमांशी बोलत होते.

20 तारखेची निवडणूक सुद्धा भाजपने आपल्या मतांच्या कोट्यापेक्षा अधिक उमेदवार उभे करून महाविकासआघाडीत खूप मोठा असंतोष आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपच्या हवेत उडणाऱ्या या विमानाचं संध्याकाळी लँडिंग होई, असं ते म्हणालेत.

भाजपने खूप मोठं संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं. परंतु आता एकदंर जे चित्र दिसतं आहे त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपबद्दल असंतोष आहे. तो असंतोष संध्याकाळी मतमोजणीच्या निमित्ताने स्पष्ट होईल, असं भास्कर जाधव म्हणालेत.

दरम्यान,  आज सांयकाळी सात वाजता राज्यसभा निवडणुकीबाबतचं चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आमच्या ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील आणि आमचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नाही. या लोकशाहील नवीन कोणी मालक निर्माण झालं आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आजपासून भाजपच्या अध:पतनाला सुरुवात झालीये” 

राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! 

एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; भाजपच्या गोटात खळबळ 

आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, आमचे चारही उमेदवार विजयी होतील- संजय राऊत 

MIM चा पाठिंबा कोणाला?; इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितलं