‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला

रत्नागिरी | कोकणातील दोन दिग्गज नेते कुणबी समाजाच्या विधानसभेच्या तिकिटावरुन आमनेसामने आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहेत.

कोकणातील विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. त्याला तटकरे यांनी विरोध केला. त्यामुळे जाधव संतापले आणि त्यांनी तटकरेंवर हल्लाबोल केला

कोकण शिवसेना उप प्रवक्ते गुहागर आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, आपल्या घराण्यासाठी म्हणजेच केवळ नाव राष्ट्रवादी आणि काम मात्र आयुष्यभर कुटुंबवादी. हा शिक्का पुसावा म्हणून मी त्यांना सल्ला दिला होता की, कुणबी समाजालाही जागा सोडावी. कुणबी समाजाला जागा मिळाली म्हणजे त्यांचा अपमान होईल असं त्यांना का वाटत? असा सवालही जाधव यांनी केला.

विधानपरिषदेच्या आमदारकीची योग्यता केवळ आमच्याच घराण्यात आहे आणि कुणबी समाजात ती योग्यता नाही असं बोलून त्यांनी कुणबी समाजाचा अपमान केला की सन्मान केला? राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांचं आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ असं म्हणत त्यांनी माझ्यावर खोचक आणि उपरोधिक भाष्य केलं.

मला त्यांना सांगितलं पाहिजे की, मार्गदर्शन करण्यासाठी ज्याचे आचार, विचार चांगले असतात,वर्तन स्वच्छ असते, राजकीय कारकिर्द स्वच्छ असते त्याला मार्गदर्शन करणं योग्य आहे.

तटकरेंनी खोट्या कंपन्या स्थापन करुन गोरगरिबांच्या हजारो एकरच्या जमीन घेतल्याचा आरोप तुमच्यावर होत आहे. अशा तुमच्यासारख्या महान माणसाला मार्गदर्शन करणं माझ्या अखत्यारितील गोष्ट नाही असंही भास्कर जाधव म्हणाले.

सुनील तटकरे यांना फक्त घ्यायचं माहिती आहे, द्यायचं माहीत नाही. सुनील तटकरे यांना खासदार करण्यात माझं योगदान आहे. तटकरेंना मदत करणाऱ्यांचं त्यांनी कायमच वाटोळं केलं आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एअर इंडियानंतर ‘या’ कंपनीला विकणार 

वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!

जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा…- देवेंद्र फडणवीस 

भाजप हा नंबर एकचा पक्ष बनला आहे- चंद्रकांत पाटील

‘आ देखें जरा किसमे कितना है दम’; नवाब मलिकांचं भाजपच्या ‘या’ नेत्याला ओपन चॅलेंज