मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारं कॉमेडीचं खणखणीत नाणं म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदमने छोट्या पडद्यावरुन आपल्या विनोदाने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता भाऊ नव्या रंगात आणि नव्या ढंगात तुमच्या भेटीला येणार आहे.
भाऊ कदम आता ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमातून नव्या नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर येणार आहे. रुपेरी पडद्यावर भाऊ मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
कल्पराज क्रिएशन प्रस्तुत डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित ‘व्हीआयपी गाढव’ हा सिनेमा संजय पाटील यांनी दिग्दर्शित केला आहे.
या सिनेमाचं चित्रिकरण अहमदनगरमधील एका छोट्याशा गावात झालेलं आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणेच या सिनेमाचे कलाकारही तितकेच विनोदी आहेत.
मुख्य भूमिकेत भाऊ कदमसोबत शितल अहिरराव तर भारत गणशपुरे, विजय पाटकरसोबत पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे सहकालाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेमाची कथा डॉ.रणजित सत्रे यांची असून पटकथा डॉ.प्रसन्न देवचके यांची आहे. चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाला अशोक वायंगणकर यांचे संगीत आहे. तर गाण्यांच गीतकार मोमीन कवठेकर आहेत.
दरम्यान, सिनेमाला असणारा ग्रामीण बाज आणि दादा कोंडके स्टाईल कॉमेडीने हैदोस घालणारा ‘व्हीआयपी गाढव’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका
-अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ
-कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे
-अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ
-संभाजी ब्रिगेड आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चं काम करणार!