Top news देश

सेक्स व्हिडीओ प्रकरण, भय्यू महाराज प्रकरणात धक्कादायक खुलासा

Bhayyu Maharaj e1638074500773

भोपाळ | दिवंगत अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आ.त्म’ह..त्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ (Bhaiyuu Maharaj Viral Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत असल्याचं समोर आलं आहे. पलकच्या त्रासाला कंटाळूनच भय्यू महाराज यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. (या संदर्भात समोर आलेलं व्हॉट्सअप चॅट बातमीत खाली दिलेलं आहे)(Bhayyu Maharaj Whatsapp Chat Leaked)

भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी म्हणजेच 26 नोव्हेंबर रोजी न्यायालयात तब्बल 109 पानांंचं व्हॉट्सअ‍प चॅट सादर केलं आहे. या चॅटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी असून त्यांचा खुलासा झाल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. या चॅटमुळे भय्यू महाराजांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा खुलासा देखील झाल्याचं मानलं जात आहे.

फॉरेन्सिक टीमने सादर केलेल्या अहवालात पलक ( Bhayyu Maharaj and Palak) नावाची तरुणी पीयूष जीजू नावाच्या एका व्यक्तीसोबत व्हॉट्सअपद्वारे चॅट करत असल्याचं समोर आलं आहे. त्यातून काही तथ्य समोर आल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे भय्यू महाराज प्रकरण हे एक खूप मोठं षडयंत्र होतं, असं आता उघड झालं आहे.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पलकला यापूर्वीच अटक केली आहे. तिच्यासह दोन जणांवर संशय होता. पलकने आश्रमातील दोन सेवकांच्या मदतीने भय्यू महाराजांचा छळ चालवला होता. यामुळे भय्यू महाराजांनी आ.त्म’ह..त्या केली, असा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पोलिसांनी कसा केला तपास?

भय्यू महाराज यांनी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर पोलिसांनी पलकसह आणखी काही जणांना अटक केली होती. सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. सर्व आरोपींच्या मोबाईल चॅटिंगचा डेटा रिकव्हर केला. या चॅटमधून जी माहिती समोर आली ती पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.

आरोपी चॅटिंग करताना भय्यू महाराज यांचा उल्लेख BM या सांकेतिक नावानं करायचे. एका चॅटमध्ये तर त्यांनी केलेला उल्लेख अत्यंत धक्कादायक आहे.  भय्यू महाराजांचा वेडं करण्याचा प्लॅन असल्याचं या चॅटद्वारे समोर आलं आहे. यामध्ये भय्यू महाराजांची पत्नी आयुषी (Bhayyu Maharaj Wife name is Ayushi ) आणि मुलगी कुहू ( Bhaiyyu Maharaj Daughter Kuhu ) यांचा देखील उल्लेख आहे.

आरोपींच्या मोबाईल चॅटिंगमधील ठळक भाग-

पीयूष- कुणासोबत?
पलक- मांत्रिकासोबत…
पलक- आपल्याला BM ला वेडं करुन घरी बसवायचं आहे….
पीयूष- कुहू घरी येणार त्यामुळे उद्या तिची रुम स्वच्छ केला जाईल…

पलक- कुहूने शरदला म्हटलंय, की ती जर समोर आली तर मारुनच टाकेन
पलक- आयुषीने येऊन परत सगळं काम खराब केलं…
पलक- आयुषीने वैनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकलेत…

भय्यू महाराज प्रकरणात नेमकं काय काय घडलं? ( Bhaiyyu Maharaj Case)

दिवंगत अध्यात्मिक भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गो.ळी झाडून आ.त्म.ह.त्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अ.टक केली होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत काही अश्लील व्हिडीओ बनवले होते. अटकक केलेल्या दोन सेवकांद्वारे ती भय्यू महाराजांचा ब्लॅकमेल करत होती. तीने भय्यू महाराजांसोबत लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव देखील टाकला होता. मात्र त्यांनी आयुषीसोबत लग्न केलं होतं.

पलकनं एवढं सगळं का केलं?

पलकसह दोन्ही आरोपींचा भय्यू महाराज यांच्या संपत्तीवर डोळा होता. त्यासाठी त्यांनी काही योजना आखल्या होत्या, याच योजनांद्वारे त्यांनी भय्यू महाराज यांचे अश्लील व्हिडीओ बनवले होते. या माध्यमातून भय्यू महाराजांना धमकी दिली जायची. त्यामुळे भय्यू महाराजांचा मोठा धक्का बसला होता. ते चांगलेच खचले होते. याच कारणामुळे नैराश्यात गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत ICMR चं मोठं वक्तव्य! 

 “उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”

‘या’ पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दीड वर्षात 1 लाखाचे झाले ‘इतके’ कोटी 

छगन भुजबळांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली, म्हणाले… 

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं उडवली सरकारची झोप; महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू