मुंबई | दिवंगत अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी 2018 मध्ये स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर नुकतंच इंदोर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने भय्यू महाराज यांच्या आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपास CSP मनोज रत्नाकर यांनी घरगुती विवादातून सुसाइड केल्याचा रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी वकील निवेज बडजात्या यांना एक धमकीचा फोन आला होता. त्यात निवेज बडजात्या यांना 5 कोटी रूपये मागितले होते.
भय्यू महाराज यांचा जुना ड्राईव्हर असलेल्या कैलाश पाटीलने हा धमकीचा फोन केला होता. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास केला. त्यावेळी महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले.
त्यानंतर पोलिसांनी भय्यू महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी देखील या तिघांना दोषी ठरवलं आहे.
पोलिसांनी या तीन गुन्हेगारांचा जवाब नोंदावला आहे. त्यातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास जबरदस्ती करत होते, असं वृत्त समोर आलं आहे.
तर पोलिसांच्या रिपोर्टमध्ये हे देखील समोर आलंय की, भय्यू महाराजांचे 12 तरूणींसोबत संबंध होते. त्यातील 2 तरूणी या आयएएस अधिकारी आहेत, असं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. यावर पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
दरम्यान, ज्यावेळी वकील निवेज बडजात्या यांना धमकीचा फोन आला, त्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण लागलं, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर नवा खुलासा झाला होता. तर काही व्हॉट्सअप चॅट देखील व्हायरल झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सेक्स स्कॅंडलमुळे चर्चेत राहिलेत ‘हे’ पाच दिग्गज क्रिकेटर, तेव्हा क्रिकेटही शर्मेनं झुकलं होतं
12वी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधी, मिळेल बंपर पगार
“संजय राऊत बावचळलेत, झिंग झिंग झिंगाट झालेत”
SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार
पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा