“कोरोना झालेल्या रुग्णांना पुण्यात कोणी बेड देतं का बेड?”

पुणे | संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुण्यात कोरोना रुग्णांना बेड न मिळाल्यानं मृत्यू ओढावल्याच्या घटना समोर येत आहेत. हाच मुद्दा पकडून पुण्यात भीम आर्मीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखं आंदोलन केलं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रुग्णालयातील बेड ठेवून “कोरोना रुग्णांना कोणी बेड देतं का बेड ?” असं म्हणत भीम आर्मीनं जिल्हा प्रशासनाच्या हतबलतेवर निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांना अधिकचे बेड उपलब्ध करून देण्याऐवजी रुग्णांना घरीच ठेवून उपचार देण्याच्या सल्ल्यावरही भीम आर्मीनं आक्षेप घेतला आहे.

पुण्यातील सर्व खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन रुग्णांना त्वरित बेड उपलब्ध करून द्या, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना रुग्णांसाठी एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सौम्य लक्षणं असूनही खासगी रुग्णालयात बेड अडवून बसलेल्या रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप सरकारने शरद पवार यांच्यावर सोपवली अतिशय महत्त्वाची जबाबदारी!

दिल्ली दरबारी शिवछत्रपतींच्या जयघोषावरून वाद; रितेश देशमुखची बोलकी प्रतिक्रिया

दाढी मिशा तर कुणीही वाढवतं, दम असेल तर…. ‘या’ नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज

भाजपचा ‘हा’ नेता पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

अंध मुलगा वडिलांच्या रुममध्ये येऊन म्हणाला, ‘एकाला संपवलं आता तुमचा नंबर’; त्यानंतर घडला थरार