…तर माझ्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही- अभिनेत्री राणी चॅटर्जी

मुंबई-  गेल्या आठ वर्षापासून एक व्यक्ती मला सतत मानसिक त्रास देत आहे. आणि हे जर असच सुरु राहीलं तर, आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. असं भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खतरों के खिलाडी 10 मध्ये झळकलेली राणी चॅटर्जी हिने आपल्या फेसबुक पेजवरती लिहलं आहे.

याशिवाय त्रास देणारी व्यक्ती मला गेली आठ वर्ष त्रास देत आहे. पण याच्याआधी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण आता मला हे सहन होत नाही. मी त्या व्यक्ती बद्दल माझ्या जवळच्या लोकांना पण सांगितल. पण ते म्हणाले जाऊदे तु दुर्लक्ष कर. पण आता मात्र मला सहन नाही होत, शवटी मी सुध्दा एक माणूस आहे असही तिने आपल्या फेसूुक पेजवरती लिहलं आहे.

त्रास देणाऱ्या व्यक्तीच नाव धनंजय सिंह आहे आणि तो मला सतत त्रास देतो. मी म्हातारी दिसते, मी जाड आहे. असही तो सतत लिहीत असतो. माझ्या आयुष्यात आधिच खुप  ताणतनाव आहेत त्यात अजून असल्या गोंष्टींमुळे खूपच मानसिक त्रास होतोय. मी जर माझ काही बरं वाईट करुन घेतल तर त्याला धनंजय सिंहच जबाबदार राहील आसही राणी चॅटर्जीने लिहल आहे.

दरम्यान,  तिने असही लिहलय की, मी सायबर सेलमध्येही तक्रार केली होती, पण ते म्हणाले होते की याने माझे नाव लिहिलं नाही. पण मला माहित आहे की ते फक्त माझ्यासाठीच लिहिलं जातं. कारण अशा पोस्टवर इतर लोक माझे नाव लिहितात आणि घाण शिव्याही देतात. आणि हा त्याचा आनंद घेतो. मी हतबल झाले आहे, आता माझ्यात हिम्मत नाही. एकतर मी आत्महत्या केली पाहिजे. कारण मी बर्‍याच वर्षांपासून खूप वाईट मानसिक अवस्थेतून जात आहे. आणखी सहन होत नाही. #सुसाईड’ असे राणीने  लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून बापानेच आवळला पोटच्या पोरीचा गळा

-सावधान! महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा