मुंबई | राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे अनेक आरोप झाले होते. काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयानं भुजबळ यांना निर्दोष मुक्त केलं होतं. पण अशातच आता पुन्हा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण गाजणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परिणामी दमानिया यांनी परत एकदा भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणात खेचलं आहे.
चमणकर कंपनी आणि आघाडी सरकारमधील तत्कालिन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यात संगनमतानं भ्रष्टाचार झाल्याचं दमानिया यांनी म्हटलं होतं. परिणामी तेव्हा एसीबीनं भुजबळांना दोषी ठरवलं होतं.
छगन भुजबळ यांना या प्रकरणात जेलमध्ये राहावं लागलं होतं. राज्याच्या राजकारणातील इतक्या उंचीच्या नेत्याला मोठ्या प्रकरणात अशी सजा झाल्यानं हे प्रकरण देशभर गाजलं होतं.
काही दिवसांपूर्वीच विशेष न्यायालयानं एसीबीचे सर्व आरोप फेटाळून लावत भुजबळ यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर आपण काही दिवस एसीबीच उच्च न्यायालयात जाईल याची वाट बघितल्याचं दमानिया म्हणाल्या आहेत.
एसीबी कसल्याही हालचारी या प्रकरणात करत नसल्याचं पाहून मी स्वत: या प्रकरणात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचं दमानिया यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं आहे.
महाराष्ट्र सदन प्रकरणात सुरूवातीला देखील अंजली दमानिया यांच्याच तक्रारीनंतर भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर एसीबीनं भुजबळ यांच्यावर 13 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप निश्चित केला होता.
आताही अंजली दमानिया यांनी थेट उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्यानं परत एकदा भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी आता भुजबळ हे या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र सदन हे प्रकरण चमणकर कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटामुळे दमानिया यांनी उचलून धरलं आहे. चमणकर कंपनीवर दमानिया यांनी तब्बल 190 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
दरम्यान, ज्या प्रकरणामुळं भुजबळ यांना तुरूंगात रहावं लागलं ते प्रकरण पुन्हा बाहेर आल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पण दमानिया आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या-
भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना
“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा”
राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी