ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं; ‘या’ अभिनेत्रीने सुशांतसाठी लिहिली पोस्ट

नवी दिल्ली | सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हळहळलंय. अभिनेत्री भूमिका चावलाने सुशांत गेल्यानंतर एक आठवड्याने सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भूमिकाने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहित ‘ते’ रहस्या तुझ्यासोबत गेलं’ असं म्हटलंय.

भूमिकाने एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी सिनेमामध्ये धोनीच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘प्रिय सुशांत, तू जिथेही आहेस देवाच्या सहवासात असशील. तू जाऊन एक आठवडा झाला. पण कशामुळे तू आत्महत्या केलीस, ते रहस्य तुझ्यासोबतच निघून गेलं. तुझ्यासोबच नेहमी असणाऱ्यांना लोकांना मी विनंती करते त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी”

 

View this post on Instagram

 

Dear Sushant – wherever you are – you are in the hands of God …. it’s Been a week since you have gone … What took you away —- THE SECRET HAS GONE WITH YOU — buried deep in your heart and mind …. I wish to tell all the people who are affected by this to pray and devote your time to things like —-Taking care of yourself , of the people around you … There are speculations of why it happened …. THERE IS MUD SLINGING – there is wrath – there is —“ who is to be blamed “ —— there is “ industry did it “ —- “ relationship did this” … so on and so forth …. Dear PEOPLE RESPECT A SOUL GONE … PRAY AND LOOK AHEAD ….. SPEND THAt TIME In caring for each other / CARING FOR THE NEEDS OF kids who need education : teach them in which ever way you can / PRAY for yourselves and others around you / EXERCISE —- stay positive … LETS NOT BLAMe PEOPLE —— LETS RESPECT Each other … LET THE industry find a solution within itself and not do public discussions on public domains —- Prayers for him

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

तुझ्या आत्महत्येनंतर खूप चर्चा सुरू आहेत. अनेकजण एकमेकांची उणीधुणी काढताय. शिवाय या प्रकरणाला जबाबदार कोण, बॉलिवूडने हे सर्व केलं का, नात्यांमुळे हे घडलं का असे बरेच प्रश्न आहेत. परंतु यावरील उपाय इंडस्ट्रीलाच काढू द्या, असंही भूमिकाने पोस्टमध्ये नमूद केलंय.

14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्र्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण वादासंदर्भात भूमिकाने पोस्ट लिहिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आज गौप्यस्फोट करतोय; अजित पवारांआधी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती”

-नगरमध्ये भाजपचा खासदार असताना सुजय विखेंना तिकीट का दिलं?; फडणवीस म्हणतात…

-…म्हणून चंद्रकांत पाटील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढले- देवेंद्र फडणवीस

-भाजप-राष्ट्रवादीचे सरकार २ वर्षांपूर्वी बनले असते, पण… फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

-गूड न्यूज… पूर्व लडाखमधून चीन सैन्य मागे घेण्यास तयार!