मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यूची मागणी; कारण ऐकून व्हाल थक्क

नवी दिल्ली | कधी कोण कोणत्या कारणासाठी इच्छामृत्यूची मागणी करेल सांगता येत नाही. अशात सध्या एक प्रकरण प्रचंड गाजत आहे. ते प्रकरण थेट राजकारणाशी जोडलेलं आहे.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून इच्छामृत्यूची परवानगी मागितल्यानं देशात खळबळ माजली आहे.

काही दिवसांपूर्वीच नंदकुमार बघेल यांना ब्राम्हण समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नंदकुमार बघेल पुन्हा चर्चेत आहेत.

नंदकुमार बघेल यांनी राष्ट्रीय मतदार जागृत मंचच्या लेटर पॅडद्वारे राष्ट्रपतींकडं आपली मागणी केली आहे. नंदकुमार बघेल या मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

देशात सध्या नागरिकांच्या सर्वच अधिकारांचं हनन होत आहे. तीनही संस्था देशातील नागरिकांच्या मौलिक अधिकारानूसार काम करत नाहीत. परिणामी राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासन, न्यायपालिका, कार्यपालिका या तिन्हींनी देशातील नागरिकांना फसवण्याचं काम केलं आहे. देशातील मतदारांचा आवाज दाबण्याच सातत्यानं काम होत आहे, असं त्या पत्रात म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यान 700 मृत्यू झाले आहेत त्यावरही सरकार काही करायला तयार नाही. अशा परिस्थितीत या सर्व मुद्द्यांचा विचार करता माझ्यासमोर इच्छामृत्यूशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही, असं नंदकुमार बघेल यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

नंदकुमार बघेल यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत नंदकुमार बघेल यांच्या पत्रावर राष्ट्रपती काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

नंदकुमार बघेल हे छत्तीसगढमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. भुपेश बघेल यांचे वडील इच्छामृत्यूची परवानगी मागत आहेत म्हणल्यावर देशात राजकारण तापलं आहे.

दरम्यान, इतक्या मोठ्या राजकीय पार्श्वभूमिच्या नेत्यानं इच्छामृत्यूची परवानगी मागण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ! जाणून घ्या आजचा बाजारभाव

 RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ