“मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, माझ्या इमेजचा फायदा…”

कोल्हापूर | राज्याच्या समाजकारणासह मनोरंजन क्षेत्रात आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीनं स्वतःची नवी ओळख निर्माण करण्यात अभिजीत बिचुकले यशस्वी ठरला आहे.

बिचुकले अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी वादात अडकला आहे. चित्रपट असो की राजकारण बिचुकले हमखास प्रसिद्धीच्या झोतात असतो.

सध्या राज्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीनं राज्याचं लक्ष आपल्याकडं वेधून घेण्यात बिचुकले यशस्वी ठरला आहे.

बिचुकले कोल्हापूर उत्तर मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवणार आहे. परिणामी सध्या राज्यात बिचुकलेची जोरदार चर्चा आहे. मी येतोय म्हणल्यावर निवडणुकीत रंग येतो, अशी चर्चा कोल्हापूरमध्ये आहे, असं बिचुकले म्हणाला आहे.

बिचुकलेनं आपलं व्हिजन सर्वांसमोर मांडलं आहे. कोल्हापूरमध्ये मंदिर सोडले तर विकास झाला नाही, पुणे-मुंबईसारखा विकास झाला नाही, असं बिचुकले म्हणाला आहे.

नेत्यांनी स्वत:ची खळगी भरली लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे, आता बघू काय होतं, असं बिचुकले म्हणाला आहे. परिणामी सध्या बिचुकलेच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

मी अधिकृत घोषणा केली नसताना राज्यात माझी चर्चा होतेय. माझ्या इमेजचा मला फायदा नक्की होईल, असं बिचुकले म्हणाला आहे.

दरम्यान, मी गेल्यामुळंच वरळी आणि कडेगावमध्ये निवडणुका लागल्या होत्या. मी आताही टक्कर देईन, असं ठामपणे बिचुकले म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आप करणार बेरोजगारी साफ! पंजाब सरकारनं युवकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

 नारायण राणेंच्या अडचणीत पुन्हा वाढ; BMCनं दिला ‘हा’ मोठा दणका

 मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळतील इतके लाख रूपये

 “पावसात शरद पवार भिजले आणि निमोनिया भाजपला झाला”

कोरोनाच्या चौथ्यालाटेबाबत डॉ. अविनाश भोंडवेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती