Russia-Ukraine War | अमेरिकेचा चीनला गंभीर इशारा, बायडन म्हणाले…

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धामुळं जग दोन गटात विभागलं गेलं आहे. जास्त प्रमाणात तर देश युक्रेनच्या बाजून उभे ठाकले आहेत. अशातच काही देश कुरापती करत आहेत.

आपल्या महत्त्वाकांक्षाना प्रभावीपणे राबवण्याचा चीनचा उद्दश सर्व जगाला माहिती आहे. चीन नवी महाशक्ती म्हणून जगासमोर येत आहे.

युक्रेन-रशिया युद्धाच्या परिस्थितीचा फायदा घेत चीन युरोपमध्ये आपले औद्योगिक साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण रशियाला डावलून हे शक्य असल्याचं सध्यातरी दिसत नाही.

चीननं रशियाच्या बाजून उभा राहील्यास गंभीर परिणामांचा सामना चीनला करावा लागेल, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे.

शी जिनपिंग जर रशियाची मदत करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी एक गोष्ट समजून घ्यावी की असं केल्यानं युरोपमधील त्यांच्या महत्त्वाकांक्षांना धक्का बसणार आहे, असंही बायडेन म्हणाले आहेत.

बायडेन यांनी चीनला इशारा देताना आगामी काळात होणाऱ्या आर्थिक फायद्याचा उल्लेख केल्यानं आता चीन कोणतं पाऊल उचलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रशियाला जी-20 गटातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज यावेळी बायडेन यांनी बोलून दाखवली आहे. परिणामी रशिया-अमेरिका संघर्ष देखील वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चीननं उघडपणे रशियाचं समर्थन केलं नसलं तरी छुप्या पद्धतीनं रशियाला मदत करत असल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; PM Kisan योजनेत झाला मोठा बदल

 ‘8 वर्ष देश चालवल्यानंतर पंतप्रधानांना…’; केजरीवालांनी भाजपला झाप झाप झापलं

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”