भारतीय गोलंदाजांवर पैशांचा पाऊस; वाचा कोणत्या गोलंदाजाला मिळाली किती रक्कम

बंगळुरू | क्रिकेट हा भारतासाठी नव्हे तर जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी एक महत्त्वाचा खेळ बनत चालला आहे. अशातच भारत हा क्रिकेटची महासत्ता म्हणून सध्या जगात ओळखला जात आहे. (IPL Auction 2022)

बीसीसीआयच्या माध्यमातून भारतातील क्रिकेटचं नियोजन केलं जातं. बीसीसीआय जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट लीग दरवर्षी आयोजित करत असते.

आता यावर्षीच्या 2022 आयपीएलच्या हंगामापूर्वी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सध्या चालू आहे. जगभरातील 500 हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले आहेत.

लिलावाच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांवर कोट्यावधींची बोली लावण्यात आली आहे. जागतिक दर्जाचे गोलंदाज घेण्यापेक्षा भारतीय वेगवान गोलंदाज घेण्यावर संघ मालकांनी रस दाखवला आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी अष्टपैलू कामगिरी करणारा दीपक चहर हा सर्वाधिक बोली लागलेला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याला तब्बल 14 कोटींमध्ये चेन्नई संघानं खरेदी केलं आहे.

आत्ताच पार पडलेल्या भारत-वेस्ट इंडिज दरम्यानच्या वनडे मालिकेत भेदक गोलंदाजी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला राजस्थान राॅयल्स संघानं तब्बल 10 कोटी रूपयांना खरेदी केलं आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी अप्रतिम कामगिरी केलेल्या शार्दुल ठाकूरवर दिल्लीनं मोठी बोली लावली आहे. तब्बल 10 कोटी 75 लाख रूपये खर्च करून ठाकूर दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

हैदराबादसाठी गत हंगामात आपल्या धारदार गोलंदाजीनं विरोधी संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज टी. नटराजनला हैदराबाद संघानं पुन्हा एकदा 4 कोटी रूपये खर्चून संघात घेतलं आहे.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांना विदेशी गोलंदाजांपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. अशातच आता हे गोलंदाज या आयपीएलमध्ये आणि भारतीय संघासाठी येणाऱ्या काळात कशी कामगिरी करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईने लावली महाबोली! IPL इतिहासातील सर्वात महागडा विकेटकिपर मुंबईच्या ताफ्यात दाखल

 ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तुमचं आयुष्य कमी तर होत नाही ना?, नॉनव्हेज खाणारांनो एकदा नक्की वाचा

मोठी बातमी! आयपीएलची लिलाव प्रक्रिया थांबली, Auctioneer अचानक खाली कोसळले ; पाहा व्हिडीओ

क्रूझ पार्टी अटकेनंतर पहिल्यांदाच दिसला आर्यन खान, फोटो झाले व्हायरल