पुण्याला हादरवणाऱ्या मटका किंग संजय पाटोळे हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबई | काही दिवसांपूर्वी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

संजय पाटोळे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. संजय पाटोळे हा ‘मटका किंग’ म्हणून ओळखला जात होता. या घटनेनंतर कात्रज परिसर हादरून गेला होता.

शिरवळ येथील निरा नदी काठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यानं संजय पाटोळेचा जागीच मुत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी कसून तपास केला आहे.

अशातच मटका किंग खून प्रकरणी भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी केली अटक केली आहे. शिरवळ पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र प्रदेश भाजप माथाडी नेता अमोल हुलावळे याला अटक केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात देखील हे प्रकरण गाजत असल्याचं दिसतंय.

अमोल हुलावळे हा पुण्यात गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. संजय पाटोळेच्या हत्येनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत या प्रकरणी कारवाई केली आहे.

अवैध व्यावसायाच्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांनी 8 जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नव्या बदलासह नवी ‘Maruti Suzuki Baleno’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार!

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…