सुशांतप्रकरणी मोठी कारवाई ! बंगळुरूमधून ‘या’ बड्या अभिनेत्रीसह दोघांना अटक

बंगळुरू | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबीच्या टीमनं सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा व्यापार आणि सेवन या आरोपाखाली अनेकांना अटक केली आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील अनेकांची याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता ड्र.ग प्रकरणी आणखी एका अभिनेत्रीला अटक केलं आहे.

बंगळुरूची केंद्रीय गु.न्हे शाखाही कन्नड चित्रपट सृष्टीतील अं.मली पदार्थांचं सेवन आणि व्यवसाय प्रकरणाचा तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणात सीसीबीनं शुक्रवारी सकाळी कन्नड अभिनेत्री रागिणी द्विवेदीच्या घरी छापा टाकला होता. तसेच शुक्रवारी दुपारी रागिणीला सीसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. तपासादरम्यान रागिणी द्विवेदी विरोधी पुरावे मिळाल्यानं सीसीबीनं रागिणीला अटक केली आहे.

अभिनेत्री रागिणी द्विवेदीसह या प्रकरणात आणखी दोघांना अटक केली आहे. राहुल आणि विरेन खन्ना असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच पोलिसांनी गुरुवारी रविशंकर नावाच्या अन्य एका आरो.पीलाही अटक केली आहे. बंगळुरू गु.न्हे शाखेचे संयुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

‘अभिनेत्री रागिणी द्विवेदीला ड्र.गप्रकरणी अटक केलं गेलं आहे. तसेच खन्ना नावाची व्यक्ती मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करत होता. खन्ना पार्ट्यांमध्ये अं.मली पदार्थ उपलब्ध करून देत होता. दिल्लीत राहणाऱ्या खन्नाला सीसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन अटक केली आहे,’ अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तसेच रियाचा भाऊ शौविक यांच्या मोबाईलमध्ये सीबीआयला ड्र.ग्जविषयीचं काही चॅट आढळलं होतं. यामुळे एनसीबीच्या एका टीमनं शुक्रवारी सकाळी रियाच्या घरावर छापा टाकला होता. तसेच एनसीबीच्या दुसऱ्या टीमनं रियाच्या कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरावर छापा टाकत सॅम्युअलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

एनसीबीच्या टीमनं एकसाथ दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू ठेवलं होतं. तपासादरम्यान एनसीबीला शौविक आणि सॅम्युअल विरोधी पुरावे मिळाल्यानं काल दोघांना अट.क केलं आहे. आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान सॅम्युअल आणि शौविकला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. सॅम्युअल आणि शौविकच्या चौकशीसाठी एनसीबी न्यायालयाला कोठडीची मागणी करणार आहे. तसेच या दोघांसोबतच रियालाही अट.क केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अटकेची शक्यता

ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात