नवी दिल्ली | कोरोना काळातील अनेक अडचणींचा सामना करणारी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या वेगानं धावण्यासाठी सज्ज असल्याचं पहायला मिळत आहे. अशात केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर करायला सुरूवात केली आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी डिजीटल अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना काळात अर्थव्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागला होता. अशातही या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.
देशाला गेल्या दीड वर्षात आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सातत्यानं गरज भासत आहे. कोरोना महामारतीरीनं भाय आरोग्य व्यवस्थेची लक्तर काढली आहेत. अशात यावर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजीटल आरोग्य व्यवस्थेसाठी एक धोरण तयार करत आहे. परिणामी त्याचाच एक भाग म्हणून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. विमा संरक्षण ही आता आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट बनली आहे.
आपत्कालिन विम्या अंतर्गत आता 5 लाखांपर्यंत मिळणार आहे. देशात कोरोना काळा मोठ्या प्रमाणात नागरिकांना वैद्यकिय विम्याचं महत्त्व कळायला लागलं आहे. रूग्णांच्या परिवारातील सदस्यांकडून विमा घेण्यात येत आहे.
वय, व्यक्ती आणि आरोग्याच्या गरजांंप्रमाणं विमा घेतला जातो. मात्र आरोग्य विम्यावर असलेल्या 18 टक्के जीएसटीमुळं मोठ्या प्रमाणात विम्याच्या प्रिमीयममध्ये वाढ झाली आहे.
कोट्यावधी नागरिकांच्या आवाक्यात आरोग्य विमा येण्यासाठी आरोग्य विम्याच्या करांमध्ये मोठी घट करणं गरजेचं आहे. जीएसटी आकारणी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, निर्मला सितारमण यांनी पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला आहे. देशात जास्तीत जास्त प्रमाणात डिजीटल कारभारावर भर देण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण
सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार?
‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य