नवी दिल्ली | स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ दिल्लीच्या सीमेवर आणि संसदेच्या वेशीवर झालेलं आंदोलन म्हणून शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) ओळखण्यात येतं. सध्या या आंदोलनाचा शेवट होण्याची शक्यता आहे.
प्रचंड बहुमताच्या जोरावर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारनं विविध क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्याच सपाटा लावला होता. यात मोदी सरकारला काही प्रमाणात यश मिळालं आहे.
मोदी सरकारनं आपल्या बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या विषयाला हात घालण्याचं काम केलं. शेतीतील बदलांसाठी सरकारनं तीन कृषी कायदे संसदेत आवाजी बहुमतानं पारित केले.
कायदे पारित होताच देशात शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू झाला. शेतकरी आंदोलनानं मोठ्या प्रमाणात पेट घेतला. गेल्या एका वर्षात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या संघर्षात तब्बल 750 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
शेतकरी जाग्यावरचे हालायला तयार नाहीत हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे मागं घेत असल्याचं घोषित केलं आहे.
अशातच आता मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 3-3 लाख रूपये देण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
चंद्रशेखर राव यांनी या आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत करण्याची घोषणा केल्यानं त्यांच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा करतानाच केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांच्या परिवाराला 25 लाख रूपयांची मदत करावी, असं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागं घेण्याची विनंती ही राव यांनी मोदी यांच्याकडं केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर लवकरच आपल्या शिष्टमंडळासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत. तेव्हा त्या भेटीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, अनेक स्तरातून शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना सरकारनं शहीद घोषित करावं यासाठी मागणी जोर पकडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थानच्या राजकारणात मोठी घडामोड; सर्व मंत्र्यांचे राजीनामे अन् मुख्यमंत्री…
शरद पवार खोटं बोलले, देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढण्याची शक्यता; ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ