क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सितारामण यांनी डिजीटल करन्सी आणणार असल्याची मोठी घोषणा केली. स्वतः रिझर्व्ह बँक ही करन्सी आणणार आहे. त्यामुळे डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लवकर रिझर्व्ह बँकेद्वारे ब्लॉकचेन आणि अन्य तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलन लाँच करण्यात येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल रुपी लाँच करण्यात येईल. त्यामुळे भारतातील गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्याचा नवा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध होणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या या क्रिप्टो चलनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केला. तसेच क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर लागणार असल्याचंही निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षांची ब्ल्यूप्रिंट आहे. विकास हाच या बजेटचा हेतू असून शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून हा बजेट तयार करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के राहणार असल्याचं सांगून अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचं यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतासह देश कोरोना संकटाशी झुंज देत असताना सीतारामण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करून देशवासीयांना मोठा दिलासा दिला आहे.

आगामी काळात देशातील प्रत्येक कोपऱ्यात डिजिटल बँकिंग, फिनटेक आणि डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढवण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेतील आपल्या अर्थसंकल्प वाचनादरम्यान याबद्दल माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा 

Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा 

Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण 

सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार? 

‘…त्यामुळे आम्ही जनावरांसारखे बनतो’; शोएब अख्तरचं खळबळजनक वक्तव्य