कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगानं अनेकांचं जगणं अवघड करुन टाकलं आहे. त्यामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला पहायला मिळाला.

कोरोनाच्या कठिण काळात अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. अनेक वाईट परिस्थितींचा सामना केला आहे.

कोरोना काळात अनेक मुलं कुटुंब अनाथ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. अशातच या अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे.

कोरोनामध्ये अनाथ झालेल्या मुलांना सक्षम बनवण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना सुरु करण्याची घोषणा मोदी सरकानं केली आहे.

योजनेंतर्गत करोना काळात पालक गमावलेल्या मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांद्वारे दर महिना 4 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

जर एखाद्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असेल, तर पीएम केअर्स त्यातही मदत करणार असल्याचं मोदी सरकारनं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा नव्यानं वाढ होत आहे. त्यामुळे भीतीचं सावट पसरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “देवेंद्र फडणवीस गैरसमज झाले असतील तर…”

  मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर

  Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले ‘मी माझे कपडे विकून लोकांना…’ 

‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर