मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा भाजपच्या त्या ’12’ आमदारांना जोरका झटका

नवी दिल्ली | पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यामुळे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं या 12 आमदारांना जोरदार झटका दिलाय आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात आता या 12 आमदारांना उपस्थित राहता येणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 11 जानेवारीला होणार आहे.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणं चांगलंच महागात पडलं. त्यावेळी तालिका अध्यक्ष यांच्या समोरचा माईक आणि राजदंड पळवला होता. तर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यामुळे या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

दरम्यान,पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.

एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली.

सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

अँटालिया प्रकरणावर राज ठाकरे म्हणाले,’…हे मी आधीच सांगितलं होतं’ 

महाविकास आघाडीचं सरकार पडेल का?, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

MLC Election | देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले 

“दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते तरी दाखवावेत”