भाजपला आणखी मोठा धक्का! खडसेंनंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याही राष्ट्रवादीत जाणार

जळगाव | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करणाऱ्या भाजपच्या एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खडसे यांच्या बरोबरच आणखीही काही मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता खडसे यांच्या पाठीमागे खडसे यांची कन्या आणि भाजप नेत्या रोहिणी खडसे यादेखील भाजप पक्ष सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे. एका वृत्त माध्यमाशी बोलताना रोहिणी खडसे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

आदरनीय नाथाभाऊंनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण नाथाभाऊंच्या निर्णयासोबत आहोत. आदरणीय एकनाथ खडसे यांच्याबरोबरच मी देखील आता भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षासाठी काम करणार आहे, असं रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या उभारणीसाठी खूप कष्ट घेतले आहेत. पक्षासाठी एकनाथ खडसे यांनी 40 वर्ष संघर्ष केला आहे. ज्या गावांमध्ये कॉंग्रेसचं जबर वर्चस्व होतं त्या गावांमध्ये नाथाभाऊंनी पक्ष रुजवला आहे. यामुळे पक्ष सोडताना आम्हा सर्वांनाच दुःख होत आहे, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे हे गेल्या कित्येक दशकांपासून भाजपचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबर देखील पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. यामुळे ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसे यांच्या प्रवेशाची बातमी आमच्यासाठी सुखद आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील सांगितला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबर आणखीही काही नेते राष्ट्रवादीत येण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपचे काही आमदार खडसे यांच्या संपर्कात आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने इतर नेत्यांचा पक्षप्रवेश होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! बिस्किटांची चव ओळखण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय तब्बल 40 लाख रुपये

माणसातील माणुसकी ओळखण्यासाठी ‘या’ 9 गोष्टी ठरतील खूप उपयुक्त! नक्की वाचा

‘…तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल’; राष्ट्रवादी प्रवेशापूर्वीच खडसेंच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यानं समर्थक हैराण!

महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!

अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती