भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. बऱ्याच दिवसांपासून राजकारणात भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच नाव आपल्या समोर येत आहे. अलीकडे एकनाथ खडसे भाजपमधीलच काही नेत्यांची नावं घेत त्यांच्यावर आरोप करत आहेत.

एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांमुळे खडसे भाजप पक्षाला रामराम ठोकणार, असं सातत्यानं बोललं जात होतं. एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशीही माहिती समोर आली आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

अशातच आता एकनाथ खडसे यांनी नरेंद्र मोदींविरोधी पाहिलं पाऊल टाकलं आहे. मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोदींविरोधी एक ट्वीट केलं होतं. एकनाथ खडसे यांनी तेच ट्वीट रिट्वीट करत भाजपच्या विरोधात पाहिलं पाऊल टाकलं आहे. खडसे यांनी भाजप विरोधी घेतलेल्या या भूमिकेनंतर भाजप नेते कशाप्रकारे व्यक्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून त्यांच्यावर टीका केली होती. आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा आणि देशाचा भ्रमनिरास केला, असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं होतं. पाटलांचं हेच ट्वीट खडसेंनी रिट्वीट केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी पाटलांचं ट्वीट रिट्वीट करत आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ते प्रवेश करणार असल्याचे जाहीर संकेत दिले आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र, घटस्थापनेचा मुहूर्त टळल्यानं ते येत्या गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे.

खडसे यांच्या पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाच्या मुहूर्तावर खडसे यांच्या समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती मिळाली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबरच भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. एकीकडे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षांतराच्या मुद्द्याला साफ नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर

अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?

नाथाभाऊंची राष्ट्रवादी प्रवेशाची ती वार्ता चुकीची, ते भाजपमध्येच राहतील?

‘या’ व्यक्तीने सातासमुद्रापार आपल्या मातृभाषेची किर्ती उंचावली; वाचा सविस्तर