मुंबई | पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर इथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत. भाजप फमेदवाराने याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झालं होतं.
महत्वाच्या बातम्या-
‘योगी पुढं जाणार हे नक्की होतं पण…’; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Election Results 2022 | शिवसेनेला मोठा धक्का! एकाही जागेवर उमेदवार आघाडीवर नाही
“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल