दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; पुढच्या काही सामन्यांमधून ‘हा’ स्टार फलंदाज बाहेर!

नवी दिल्ली | सध्या देशात सर्वत्रच आयपीएलचा माहौल आहे. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहेत. देशात आयपीएलचे अनेक चाहते आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या संघ आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच आपल्या उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहे. मात्र, आता दिल्ली कॅपिटल्सच्या टीमविषयी धक्दाकायक बातमी समोर आली आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुढील एक आठवडा सामना खेळू शकणार नाही. ऋषभ पंत याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये तान निर्माण झाल्यानं तो पुढील एक आठवडा विश्रांती घेणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमचा कर्णधार श्रेयश अय्यर याने ही माहिती दिली आहे.

शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली होती. रविवारी दिल्ली कॅपिटल्सआणि मुंबई इंडिअन्स यांच्या मध्ये झालेल्या सामन्यातही ऋषभ पंत खेळताना दिसला नव्हता. दिल्ली आणि मुंबई दरम्यान झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाचा पराभव झाला होता. यानंतर श्रेयश अय्यर याने ऋषभ पंत विषयी माहिती दिली आहे.

अय्यरला सामन्यानंतर ऋषभ पंत पुन्हा केव्हा मैदानात दिसेल, असा प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना अय्यर म्हणाला की, तो केव्हा पुन्हा खेळू शकेल याबद्दल मला काहीही माहित नाही. मात्र, डॉक्टरांनी त्याला एक आठवड्यासाठी विश्रांती घ्यायला लावली आहे.

बुधवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्स बरोबर होणार आहे. मात्र, या सामन्यात ऋषभ पंत खेळताना दिसणार नाही. ऋषभ पंतच्या जागी यावेळी ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरी दिसेल. तसेच शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज बरोबर होणार आहे. या सामन्यातही ऋषभ पंत खेळू शकणार नाही.

रविवारी दिल्लीच्या संघाने मुंबई इंडियन्स विरुद्ध 163 धावा केल्या होत्या. मात्र, मुंबई इंडिअन्सच्या सुर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांनी अतिशय उत्तम फलंदाजी केली आणि मुंबईच्या संघानं या सामन्यात विजय खेचून आणला.

दरम्यान, दिल्लीच्या संघाचा मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर श्रेयश अय्यरनं या सामन्यातील दिल्लीच्या संघाच्या त्रुटींवर भाष्य केलं आहे. आम्ही 10 -15 धावा कमी बनवल्या. जर आम्ही धावसंख्या 175 पर्यंत करू शकलो असतो तरीही संघाला विजय मिळू शकला असता. मार्कस स्टोईनिस जेव्हा बाद झाला तेव्हा संघाचं खूप नुकसान झालं, असं यावेळी अय्यरनं म्हटलं आहे.

तसेच आमच्या टीमला सध्या क्षेत्र रक्षणावर काम करणं गरजेचं आहे. मुंबई इंडिअन्सच्या टीमनं या सामन्यात आमचा चांगलाच पराभव केला आहे. यामुळे पुढील सामन्यात आमच्या संघाला उत्तम प्रदर्शन करणं गरजेचं आहे, असंही अय्यरनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लवकरच येणार टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक गाडी, किंमत ऐकून थक्क व्हाल..!

भाजपला मोठा झटका! एकनाथ खडसे भाजपला राम राम ठोकत ‘या’ पक्षाचा झेंडा हाती घेणार?

जगभरातील 150 मॉडेल्सची गुप्तरोग चाचणी करत सौदीच्या प्रिन्सनं त्यांना ‘हे’ काम करायला लावलं होतं!

‘…म्हणून एकनाथ खडसे यांनी मला राष्ट्रवादीत पाठवले’; भाजपच्या ‘या’ माजी आमदारानं केला गौप्यस्फोट

‘या’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार!