मनसेला मोठा झटका! वसंत मोरेंनंतर 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

पुणे | गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण जोरदार पेटलं आहे.

राज ठाकरेंच्या वादळी सभेचे पडसाद अद्यापही पडत आहेत. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भातील वक्तव्यानं खळबळ माजवलेली पहायला मिळत आहे.

वसंत मोरे यांनी यांविषयी विरोध व्यक्त करताच त्यांना मनसे पुणे शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे.

वसंत मोरेंना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर आता मनसेला पुन्हा एकदा जोर का झटका मिळाला आहे.

वसंत मोरे यांच्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला आहे. यावरुन मनसेमध्ये राजीनामा सत्र  सुरु तर होणार नाही ना? याची भीती निर्माण झाली आहे.

वसंत मोरे आणि पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांच्यासह आतापर्यंत चार पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मनसेतून बाहेर पडल्यावर वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर मिळाल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! मनसेतून बाहेर पडताच वसंत मोरेंना शिवसेनेची ऑफर

  पुढील 3 दिवसांत उष्णतेची लाट, ‘या’ 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

  सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

  “गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो”

  कोरोनाच्या XE व्हेरियंटबाबात तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…