Top news महाराष्ट्र मुंबई

मनसेला मोठा झटका; आता ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Raj Thackeray 00

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला बसलेला हा मोठा धक्का होता. आता मनसले आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसतंय.

विदर्भात आता मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे.

विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आगे. उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात ते घेणार प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या राष्ट्रवादीत अतुल वांदिले हे 40 पदाधिकाऱ्यासोबत प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य ,सरपंच आणि पदाधिकारी अतुल वांदिले यांच्या सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती आहे.

मनसेची आक्रमक ओळख असलेले नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने मनसेपुढे आता आ गामी निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिला असल्याचं बोललं जात होतं. अशात रूपाली पाटील ठोंबरेंनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. पक्षातील काही रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे आणि संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यातून 191 ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना स्वगृही पाठवलं- अनिल देशमुख

-अरविंद शाळीग्राम यांच्याकडे दिलेला पुणे विद्यापीठाच्या परिक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार रद्द करा- राजेंद्र विखे

-शरद पवारांवरील निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

-आमदार धीरज विलासराव देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर; खते बियाणे पुरवठा योजनेचा शुभारंभ

10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार