मुंबई पोलिसांचा किरीट सोमय्यांना मोठा झटका!

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर मुंबईत (Mumbai) गुन्हा दाखल झाला आहे.

‘INS विक्रांत’ वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. मात्र, हा निधी सोमय्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहेत.

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

माजी सैनिक बबन भोसले (Former soldier Baban Bhosle) यांनी काल रात्री उशिरा ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिलीये. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी गोळा करण्यात आलेल्या निधीवरून किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

सोमय्यांनी गोळा केलेले पैसे हे राजभवनाकडे जमाच केले नसल्याचं माहिती अधिकारात उघड झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी भारतातील लोकांना…’; इम्रान खान यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतुक 

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेताच गुणरत्न सदावर्तेंचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले… 

“अजून दगडं मारायला पाहिजे, कारण कर्म या जन्मीच फेडावं लागतं” 

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी” 

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा, म्हणाले…