जळगावात राष्ट्रवादीला खिंडार! खडसेंना धक्का देत गिरीश महाजनांचा मास्टरस्ट्रोक

जळगाव | जळगाव महापालिकेवर गेल्या अडीच वर्ष भाजपची एक हाती सत्ता होती. भाजप नेते गिरीश महाजनांचा हा बालेकिल्ला समजला जातो. अशातच भाजपच्या 27 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.

भाजप नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधल्याने हा गिरीश महाजन यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात होतं. अशातच जळगावात भाजपचं वर्चस्व टिकावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन जळगावात सक्रिय झाल्याचं पहायला मिळालं.

जळगावात आता स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार अरूण पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता अरूण पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावातील रावेर मदतारसंघातून अरूण पाटील दोन वेळा निवडूण आले आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जातोय.

ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर आता या कार्यकर्त्यांची घरवापसी झाल्याचं दिसून येतंय.

मुक्ताईनगरमधील एकनाथ खडसेंच्या तब्बल 25 ते 26 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भाजपच्या कार्यलयामध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक ही बिनविरोध होणार होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ड्रामा पहायला मिळाला. यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीच्या खेळीमुळे गिरीश महाजनांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीची वाट मोकळी झाल्याचं दिसतंय.

दोम महिन्यापूर्वी सगळं ठरलं होतं पण त्यांनी ऐन दिवशी गोंधळ घातला. सर्व ठिकाणी त्यांची दडपाशाही सुरू आहे. त्यांनी विश्वासघात केल्याचं देखील गिरीश महाजनांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“देशापेक्षा आयपीएल गरजेची वाटणाऱ्यांबद्दल काय बोलावं”

वाढदिवसाला हारतुरे केक नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा- मुरलीधर मोहोळ 

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता, ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

मी पंतप्रधान झालो तर पहिला निर्णय ‘हा’ घेईन- राहुल गांधी 

“अश्रू ढाळू नका तर असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणती पावलं उचलणार ते सांगा”