राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान

मुंबई | शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या आवडत्या स्टॉकमध्ये घसरण झाल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

एका शेअरच्या घसरणीमुळे झुनझुनवालांचं 1,200 कोटी रुपयांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हा शेअर टाटा समूहाच्या टायटन कंपनी लिमिटेडचा आहे.

हा स्टॉक बिग बुलच्या आवडत्या स्टॉकपैकी एक आहे. या आठवड्यात या समभागात सातत्याने घसरण होत आहे. टायटनचा शेअर गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये 12 टक्क्यांनी घसरला आहे.

या वर्षी जानेवारीपासून टायटनचा स्टॉक सुमारे 13 टक्क्यांनी घसरला आहे. तेव्हापासून शेअरची किंमत 300 रुपयांहून अधिक खाली आली आहे.

परिणामी राकेश झुनझुनवाला यांच्या नेटवर्थवर झाला आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 1,200 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

झुनझुनवाला दाम्पत्याने जानेवारी-मार्च 2022 तिमाहीत या कंपनीचे शेअर्सही विकले आहेत. त्यांची हिस्सेदारी 5.09 टक्क्यांवरून 5.05 टक्क्यांवर आली आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 3,53,10,395 शेअर्स आहेत तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95,40,575 शेअर्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…” 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ 

“खासगीकरणाची खाज वाढायला लागलीय, कुठे-कुठे खाजवणार?” 

 “महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणाऱ्या काळात निवडणुका एकत्र लढणार”

‘भोंगा आवडत नसेल तर ऐकू नका’; रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं