मुंबई | शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तानाजी सावंत यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं कळतंय.
तानाजी सावंत यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं.
सांवंत यांची भाजपशी वाढती जवळीक पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं.
पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सावंत यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांना चांगलेच धारेवर धरलं होतं.
या बैठकीत समान निधी वाटप, अखर्चित निधी, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली 5 कोटींची कामे, यासह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्यावर आवाज उठवल्याने चांगलीच खडाजंगी झाली. आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने खासदार आणि पालकमंत्र्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विकास कामांच्या निधीचे समान वाटप व्हावे अशी आग्रही मागणी आमदार तानाजी सावंत यांनी लावून धरली. उस्मानाबाद- कळंब तालुक्याला रस्ते कामासाठी 6 कोटी 50 लाख निधी दिला गेला. तर भूम-परंडा मतदार संघात 1 कोटी 80 लाख रुपये देण्यात आला. याप्रमाणे इतर कामातही निधीचे वापट कमी- जास्त केल्याचं तानाजी सावंत यांनी निदर्शनास आणून दिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं
Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर
“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील”
विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले…
“मोदींच्या विचारांची उंची महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये येणं कधी शक्यच नाही”