शिवसेनेला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलीच राजकीय नाट्य रंगली आहेत. कोरोनाकाळात विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालूच आहेत. अशातच आता महाविकास आघाडी सरकारच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेना पक्षातील काही नेत्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतल्याचं समोर येत आहे.

शिवसेनेच्या अनेक निष्ठावान नेत्यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या तब्बल 7 बड्या नेत्यांनी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. शिवसेनेतून मनसेमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या यादीत काही नगरसेवक सुद्धा आहेत. त्यामुळे औरंगाबाद मधील शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

मनसेत प्रवेश केलेल्या शिवसैनिकांमध्ये काहींनी शिवसेनेचे उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदेही भूषविली आहेत. तसेच फेब्रुवारी मध्येच चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनीही मनसेचा झेंडा हाती घेतला होता.

औरंगाबाद महापलिका निवडणुक तोंडावर आलेली असताना शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसे नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद महापालिका निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून थेट शिवसैनिकांनाच मनसेत सहभागाचं आमंत्रण दिलं होतं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेसाठी चर्चेत असतात. मात्र, मनसेनं जानेवारीत भगवा झेंडा हाती घेतल्यानं राज ठाकरे येत्या काळात कोणती पाऊल उचलतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!

सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली