शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता जाणार शिंदे गटात

मुंबई | शिवसेनेला बहुमत चाचणी आधीच आणखी एक जबर धक्का बसला आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालं आहे.

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीसोबतची युती तोडावी अशी भूमिका शिवतारे यांनी जाहीर केली. अगदी हीच भूमिका शिंदे गटाची आहे.

एकनाथ शिंदेसह आमदार सुरतला गेले होते, त्यावेळी आपण व्हॉट्स ऍपवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांना पत्र पाठवून भूमिका मांडली होती. मात्र आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंची भूमिका ही संघटनेसाठी आहे. त्यामुळे आम्ही शिंदे यांच्यासोबत जाणं आवश्यक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावू नका, अशी विनंती सर्वांनी केली आहे. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी ती मान्य केली नसल्याचंही शिवतारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळलं 

सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका, उद्या बहुमताची चाचणी होणार

मोठी बातमी! औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार, कॅबिनेट बैठकीत 3 महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर

मोठी बातमी! बहुमत चाचणीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन

‘बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, मुंबईत येताच…’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य