Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका

uddhav takare 3

मुंबई | ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) राज्य सरकारची (State Goverment) याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या(Suprime Court) या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयांमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात याव्यात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार आता राज्यात या महिन्यात (डिसेंबरपर्यंत) होणाऱ्या निवडणुका(Election) या ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होणार आहेत.

या महिन्यात होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. म्हणजेच ओबीसीच्या जागा आता सर्वसाधारण प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे. हा सरकारला बसलेला सलग दुसरा झटका असल्याचं बोललं जात आहे.

केंद्राने राज्याला इम्पेरीकल डाटा (Empirical data ) द्यावा किंवा तसा डाटा राज्य सरकार तयार करेपर्यंत संपूर्ण निवडणूकच रद्द करा, अशी याचिका राज्य सरकारने (Maharashtra state) केली होती.

राज्य सरकारच्या या मागणीवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, राज्याने आरक्षण लागू करण्यासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला हवी. पण त्यासाठी केंद्राने डाटा शेअर करावाच, असे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत

केंद्राच्या म्हणण्यानुसार, तो डाटा निरुपयोगी आहे. यावेळी राज्य सरकारच्या वतीने अॅड मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकारच्या वतीने युक्तीवाद केला तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल अॅड तुषार मेहता यांनी यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी फेटाळल्यामुळे आता राज्य सरकारला आपली स्वत:ची यंत्रणा वापरुनच डेटा गोळा करावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. महाविकासआघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले… 

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका 

“वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, पण…” 

…म्हणून रूपाली पाटील ठोंबरेंनी दिला राजीनामा; खरं कारण आलं समोर 

तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे म्हाडाने केली ही मोठी घोषणा