बीग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेंना मिळाली नियमभंगाची शिक्षा

मुंबई : ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमामधील अभिजीत केळकरसारख्या स्ट्राँग कन्टेस्टंट घरातून गेल्याने अनेकांना आता खेळ कधीपण बदलू शकतो याचा अंदाज आला आहे. तसेच सगळी खेळाडू नवीन खलबतं रचताना सुद्धा दिसत आहेत. घरात कॅप्टन्सी टास्कला सुरूवात झाली. पण अभिजीत बिचुकलेंकडून बिग बॉसच्या घरातील वारंवार केल्या जाणाऱ्या नियम भंगामुळे बिग बॉसने कॅप्टन्सीममध्ये उमेदवारी न देण्याची शिक्षा बिचुकलेंना दिली.

कॅप्टनसी पदाच्या निवडीसाठी गार्डन एरियामध्ये सगळ्या स्पर्धकांचे फोटो स्टँडवर लावले गेले होते. प्रत्येक बझरनंतर एका फोटोवर एका स्पर्धकाने जाऊन काळा स्प्रे मारत त्या स्पर्धकाला कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढण्याचा टास्क होता. 

ज्या २ स्पर्धकांचा स्टँड शेवटी वाचेल त्यांना उमेदवारी मिळेल असा नियम होता.टास्क सुरु होताच नेहा पहिल्यांदा गेली कारण ती मागच्या आठवड्यात कॅप्टन होती आणि तिने हीनाच्या फोटोवर स्प्रे केलं. त्यानंतर वीणा गेली आणि तिने शिवानीच्या फोटोवर स्प्रे करत तिला कॅप्टनच्या रेसमधून बाहेर काढलं.

बिग बॉसने टास्क संपल्याची घोषणा केल्यानंतर किशोरी आणि शिव या आठवड्याचे कॅप्टन्सी उमेदवार असल्याचं सुद्धा जाहीर केलं. 

दरम्यान, कॅप्टन्सीचा टास्क कसा पार पडणार आणि या आठवड्यातील कॅप्टन कोण होणार??? याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काश्मीरच्या राज्यपालांनी दिलेलं ‘ते’ आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं

-“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”

-पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर

-धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती

-ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार