BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात त्यांना घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर तासाभराने त्यांची चौकशी सुरू झाली. साडेआठच्या सुमारास त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.

अशातच 8 तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना आता अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता विषयी चौकशी सुरू आहे. नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले होते.

नवाब मलिकांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते असले तरी महाविकास आघाडी सरकार मधील नेते आहेत त्यामुळे आता पुन्हा केंद्र विरूद्ध राज्य असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“कमळाबाई लाविते काडी, पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना राष्ट्रवादीचा रांगडा गडी”

“कोरोना वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून निघाला त्याचा मालक बिल गेट्स”

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ