BIG BREAKING: नवाब मलिक यांची तब्येत बिघडली, मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सक्तवसुली संचनालयानं चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.

नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यात मालमत्ता व्यवहार झाल्याचा ठपका ईडीनं मलिक यांच्यावर ठेवला आहे. मनी लाॅड्रिंग प्रकरणातही मलिक यांचा सहभाग असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणव होता. त्यानंतर मलिकांना तपासणीसाठी मुंबईतील भायखळातील जे. जे. रूग्णालयात आणण्यात आलं होतं.

मलिकांना अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता भाजप आणि महाविकास आघाडी समोरासमोर आली आहे.

दरम्यान, राजकारणात खळबळ उडाल्यानंतर आता मलिकांना जामीन मिळणार की नाही ?, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लेकीला छातीशी कवटाळून धायमोकलून रडला; युक्रेनमधील बाप-लेकीचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेेनेचा ‘हा’ नेता तपास यंत्रणांच्या रडारवर 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या युक्रेनला जो बायडन यांचा धक्का; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य