BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम

मुंबई | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब झालेलं हल्ला प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर राणेंवर गुन्हा देखील दाखल झाला होता.

अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पायपीट केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

त्यानंतर राणे यांनी न्यायालयासमोर शरण गेले. नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दलची माहिती दिली होती. अशातच आता नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

नितेश राणे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता 4 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणेंचा मुक्काम कोठडीत असणार आहे.

आजची आणि उद्याची रात्र नितेश राणे यांना पोलिस कोठडीतच काढावी लागणार आहे. आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबीय चिंतेत असल्याचं दिसतंय.

आता नितेश राणे 4 फेब्रुवारीनंतर नितेश राणे जामीनासाठी अर्ज करु शकणार आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना दिलासा मिळणार का?, असा सवाल आता राणे समर्थक करताना दिसत आहेत.

दरम्यान, नितेश राणे यांचा मुक्काम ओरोस जिल्हा पोलीस न्यायालयात असणार आहे. तर चौकशीसाठी त्यांना कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…