ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सर्व दुकानांवर झळकणार फक्त मराठी पाट्या

मुंबई | आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली आहे.

आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेतला. दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहिलं जात होतं. पण आता प्रस्ताव मंजूर झाल्याने दुकानदानदारांना मराठी नावही मोठ्या अक्षरात ठेवावं लागणार आहे.

दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आलं होतं. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी राज्य सरकारडे आल्या होत्या. तसेच त्यावर उपाययोजना करण्याचीदेखील मागणी होत होती.

कोरोनामुळे दोन आठवडे होऊ न शकलेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. त्यामुळे सध्या या निर्णयामुळे बरेच लोक आनंदी झाल्याचं चित्र आहे.

कोरोना (Corona) महामारीनं राज्यात धुमाकूळ घातला आहे. यातच कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरियंटनं (Omiron) चिंतेत भर पाडली आहे. दिवसेंदिवस राज्यात रुग्णांची संख्या वाढत असून निर्बंध कडक केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

  RTPCR चाचणी निगेटिव्ह आली तरी लक्षणं दिसताय?; मग ‘हे’ कारण असू शकतं

  पैशांसोबतच बायकोकडे ‘या’ गोष्टींची मागणी करणंही गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

 राज्यात कडाक्याची थंडी! पुढील 3-4 दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरणार

  ‘Omicron ला बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, सर्वांना…’; तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती