अंबादास दानवेंच्या आरोपानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकानंतर शिवसेना आमदारांचा मोठा गट फोडला. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा केला व राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पाडलं.

एकनाथ शिंदेंसोबत आमदारांना जबरदस्ती नेलं असल्याचा आरोप शिवसेनेसह काही आमदारांनी केला. त्यात शिंदे गटात सामील होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी मला फोन केला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे औरंगाबादेतील आमदार अंबदास दानवे यांनी देखील केला होता.

एकनाथ शिंदेंनी मला शिंदे गटात सामील होण्यासाठी फोन केला होता. त्यावर मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे असं उत्तर मी त्यांना दिलं, असा खुलासा अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.

दानवेंच्या या आरोपानंतर आता एकनाथ शिंदेंनीही यावर भाष्य केलं आहे. कोणत्या कारणामुळे अंबादास दानवेंना फोन केला, याचा खुलासा एकनाथ शिंदेंनी केला आहे.

मी त्यांना बंडखोरी करा हे सांगण्यासाठी फोल कॉल नव्हता केला. आमच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या घरी पत्नी व मुलांना ते फोन करत होते त्यामुळे मी त्यांना फोन केल्याचा खुलासा मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

आमदारांना सांगा मला फोन करा असं ते सांगत होते. त्यामुळे तुम्हाला काही अधिकार दिले आहेत का? तुम्ही बॉस आहात का? हे विचारण्यासाठी मी त्यांना फोन केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेना दुभंगली आहे. त्यामुळे शिवसेना विरूद्ध शिंदे गट असं युद्ध रंगलेलं सध्या पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“का लोकांची घरं बरबाद करताय चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकाल अन्…”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”

सर्वात मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका; केली मोठी कारवाई

‘महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा करा’; नितेश राणेंची सरकारकडे मागणी