लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचा ताजा भाव

मुंबई | नवीन वर्षाच्या मुहुर्तावर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Rate) चढउतार होताना दिसत होता. त्याचा थेट परिणाम आता भारतीय बाजारावर देखील होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी पडझड पहायला मिळत आहे. त्याबरोबर चांदीच्या किंमती देखील घसरल्या आहेत.

आज सोन्या चांदीच्या दरात 597 रूपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार सोन्याच्या दरात 0.17 टक्क्यांनी घसरण झाली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 46,814 रुपयांवर पोहोचले आहेत

चांदीच्या दरामध्ये देखील 369 रूपयांची घट झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 60,625 वर पोहोचले आहेत. त्यामुळे आता अनेक लोकं सोनं चांदी खरेदी करताना दिसत आहेत.

सोनं हा भारतीयांसाठी जिव्हळ्याचा विषय आहे. एक उत्तम गुंतवणुक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे भारतात सोन्यावर विशेष प्रेम असलेलं पहायला मिळतं.

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. मात्र, आता चांगली संधी साधून आली आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रभावामुळे आता येत्या काही दिवसात सोनं आणि चांदीच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुंतवणुकदार सोन्याच्या दिशेने पावलं टाकताना पहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुंबई लाॅकडाऊनच्या दिशेने! आजची धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर

पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध! अजित पवार म्हणतात, “नियम पाळा नाहीतर…”

 …अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”

 पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…